Now Loading

शासकीय योजनांचे लाभ हवाय ; लसीकरण प्रमाणपत्र दाखवा लसीकरण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

चिखली : केंद्र शासनाने हर घर दस्तक मोहिम सुरु केली असुन त्याअनुषंगाने 18 वषावरील सर्व नागरीकांचे कोविड लसीकरण पुर्ण करावयाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणुन कोविड-19 लसीकरण मोहीम व्यापक स्वरुपात राबवयाची आहे. त्याअनुषंगाने 18 वर्षावरील सर्वांनी लवकरात लवकर कोविड लसीकरण करुन घेण्यात यावे. शासकीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या सेवा व लाभ विविध प्रकारचे प्रमाणपत्र,दाखले, रेशनचे धान्य, बँकीग सुविधा, संजय गांधी निराधार/श्रावणबाळ सेवा योजनांचे अनुदान, अनुदानीत गॅस सिलेडर इत्यादी सुविधा प्राप्त करुन घेण्यापुर्वी लसीकरण करुन घेण्यात यावे. ज्या नागरीकांनी कोविड-19 लसीकरण केलेले नाही, त्यांनी लसीकरण करुन घेतल्यानंतर त्यांना वर नमुद सेवा/लाभ देण्यात येतील. तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करण्यापुर्वी सुध्दा सर्वांनी लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे तालुका कोविड नियंत्रण समिती बुलडाणा व खामगांव यांनी कळविले आहे.