Now Loading

कोविड लसीकरण जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने मार्गदर्शन

चिखली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राजेद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट, केमिस्ट यांनी कोवीड लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. या दृष्टीने 8 नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथे झालेल्या बैठकीमधे सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक गजानन घिरके यांच्या मार्गदर्शनात केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन मलकापुर ची बैठक पार पडली.    या बैठकीदरम्यान सर्व केमिस्ट बांधवांनी स्वत:चे तसेच आपल्या कुटूंबियांचे व नातेवाईक यांचे लसिकरण तातडीने पूर्ण करुण घ्यावे. तसेच आपल्या पेढ़ीमध्ये औषध खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लसिकरण करून घेण्यास प्रेरित करावे. त्यांना लसिकरणाचे फायदे व सुरक्षितते विषयी माहिती द्यावी. केमिस्ट व फार्मासिस्ट यांनी लसिकरण मोहिममध्ये सक्रिय सहभाग घेऊन ही मोहिम जनमोहिम बनवावी, असे आवाहन यावेळी श्री. घिरके यांनी केले. बैठकीला मलकापुर केमिस्ट चे अध्यक्ष गोपाल मालपाणी व मलकापुर केमिस्ट चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.