Now Loading

सिंदेवाही-लोनवाही परिसरात डुक्करांमुळे नागरिक त्रस्त

चंद्रपुर- जिल्ह्यातील तालुकास्तर असणारा शहर म्हणजेच सिंदेवाही. हा शहरात नगरपंचायत स्थापन होऊन 5 वर्ष पूर्ण होत आहे आता शहरा लगत असणाऱ्या लोनवाही ग्राम पंचायत चे सिंदेवाही नगर पंचायत मध्ये विलगिकरन करण्याचे आदेश सुद्धा प्राप्त झाले आहे व सदर नगर पंचायत चे नाव सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायत असे असणार आहे. याच हद्दित मोकाट डुक्करांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. हे जनावर सुसाट कधीही व कुठेही रत्यावर निंघतात तर कधी कुणाच्या घरी घरात घुसतात. या विषयाला अनुसरून काही नागरिक ग्राम पंचायत लोनवाही व नगर पंचायत सिंदेवाही यांना याची माहिती दिली मात्र यावर दोन्ही कार्यालयाकडून काही ही निर्णय घेतलेला नाही. आज दिनांक 10 नोव्हे रोजी लोनवावाही परिसरात पाथरी कडून सिंदेवाहीकडे झाणाऱ्या दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने दुचाकी चालकाचे दुचाकीवरुन नियत्रंण सुटले व अपघात झाला सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही मात्र वरील दोन्ही कार्यालयाची निष्काळजी ही दिसुन येत आहे.