Now Loading

दुसरबीड येथे स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न. स्नेह मिलनातून उभा केल्या जाणार मदतनिधी

चिखली:  ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत प्रवेशित झाले होते त्या निमित्ताने दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयातील सण १९९४ ला दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅच चे स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास सर्व वर्गमित्र पहिल्यांदा एकत्रितपणे एकमेकांना भेटले.कार्यक्रमात सर्वांनी आपली आज पर्यंतची वाटचाल व शालेय जीवनातील कटू गोड अनुभवांच्या आठवणींना उजाळा दिला.अतिशय भावनिक असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात पुढील वर्षीच्या स्नेहमीलन कार्यक्रमाच्या नियोजनाची सुद्धा चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन लोकजागरचे विश्वास्थ प्रवीण गिते यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजू साळवे यांनी केले. उपेक्षित मित्रांना देणार भक्कम आधार – प्रवीण गिते आपल्या समारोपीय मनोगतामध्ये आपली सर्वांची परिस्थिती सारखी नाही शेती मातीत व हातावर जीन जगणारे सुद्धा आपले काही वर्ग मित्र आहे.भविष्यात त्यांनां काही अडचण निर्माण झाल्यास त्याला त्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी आपण सर्वानी आथिर्क मदत उभी केली पाहिजे.त्यासाठी प्रत्येकने मासिक वर्गणी करण्याचे नियोजन करावे. अशी भूमिका यावेळी प्रविण गिते यांनी मांडली व त्यास सर्वांनी सहमती दाखवली लवकरच आपला बॅचचा भक्कम कोष उभारून गरजूंना ती मदत करु व मैत्रीची सार्थकता सिद्ध करू अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.