Now Loading

तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर , हडपसरमधील धक्कादायक घटना

जबरदस्तीने घरात शिरुन विवाहितेला मारहाण करुन तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या 'मजनू'वर हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यश अंकुश वाघमारे (रा. फुरसुंगी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगीतील एका ३० वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ४ नोव्हेंबरला सकाळी घरात असताना आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. फिर्यादीशी लगट करु लागला. त्याला त्यांनी प्रतिकार केला असता त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकाला सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन फिर्यादीला तू मला आवडतेस माझ्यासोबत लॉजवर चल असे बोलून त्यांचा विनयभंग केला.