Now Loading

समता विद्यालयात पूजन कार्यक्रम

उरुळी देवाची मधील समता विद्यालयात सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून शाळेत दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी संपूर्ण मैदानाला फुलांनी आणि दिवे लावून सजवण्यात आले होते. ज्या वास्तूमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम केले जाते त्या वास्तूचे पूजन करणे आवश्यकच आहे. या दिव्यानंसारखे विदयार्थ्यांचे आयुष्य आमच्याकडून उज्ज्वल व्हावे हीच ईश्वर चरणी आमची प्रार्थना आहे अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक हिरालाल पाटील यांनी दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक बाळासाहेब गायकवाड, शननु गागडे, सुशील धेंडे आदी उपस्थित होते.