Now Loading

ICC T20 रँकिंग: विराट कोहलीची फलंदाजी क्रमवारीत घसरण, केएल राहुलची लांब उडी

ICC पुरुष T20 विश्वचषक संपण्यापूर्वीच ICC ने T20 क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय T20 संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला चांगलाच फटका बसला आहे. तर केएल राहुलने शानदार फलंदाजी करताना लांब उडी घेतली आहे. विराट कोहली आठव्या स्थानावर घसरला आहे. तर केकेएल राहुल पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने सातत्यपूर्ण कामगिरी करत टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. डेव्हिड मलान दुसऱ्या तर एडन मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर आहे.