Now Loading

Solapur |पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

सोलापूर : मुख्याध्यापक आकडे पदर स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील सहा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली. यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होणेकरीता अर्ज दिला होता. सदर अर्जावर मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ०८.०९.२०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी करून, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास घेळेकर यांना अटक केली आहे.