Now Loading

वंचीत बहुजन आघाडी उस्मनाबाद वतीने एसटी कर्मचाराऱ्यांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा.

वंचित बहुजन आघाडी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभी ठाकणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत . यांनीच या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावले आहे . असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी म्हटले आहे . वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद आगार येथून हा मोर्चा निघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगरपालिकेच्या समोरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढला त्याप्रसंगी ते बोलत होते . पुढे ते म्हणाले की सत्ताधारी व विरोधकांना या कर्मचाऱ्यांचे काही देणेघेणे नाही ते फक्त एकमेकांवर आरोप करण्यात गुंग झालेले आहेत . ते एकाच माळेचे मणी आहेत . महाराष्ट्र शेजारील राज्य एसटीचे विलगीकरण विलीनीकरण करू शकते मात्र महाराष्ट्र शासन का करू शकत नाही यासाठी सत्ताधाऱ्यांची राज्यकर्त्यांची मानसिकता असली पाहिजे ती मानसिकता यांची नाही. एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या आर्थिक विवंचनेतून अनेक कर्मचाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे त्यासाठी शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी निश्चित पाठपुरावा करणार आहे. संप मोडून काढण्याच्या हेतूने जे कर्मचारी आंदोलनासाठी पुढे येत आहेत त्यांच्या वर निलंबनाची कारवाई शासन करत आहे मात्र शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी निश्चित कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहणार आहे. वेळ वेळ पडल्यास या कर्मचारी साठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयीन लढा देखील लढणार असल्याचे श्रीरंग बागूल यांनी यावेळी सांगितले याच वेळी वेळ पडल्यास चक्काजाम आंदोलन सह जिल्हा बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सदस्य भैय्यासाहेब नागटिळे , जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे , महिला अध्यक्ष जीनत प्रधान , युवक जिल्हाध्यक्ष दिलीप आडे , महासचिव बाबासाहेब जानराव , उपाध्यक्ष रोहिदास लोहकरे , युवक उपाध्यक्ष वैभव गायकवाड , भूम तालुका अध्यक्ष मुसाभाई शेख , प्रवक्ता प्रा शहाजी चंदनशिवे , धनंजय सोनटक्के , तानाजी बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष सुशील बनसोडे , महिला जिल्हा संघटक अनुराधा लोखंडे , सहसंघटक आर एस गायकवाड , शितल चव्हाण , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे , जयपाल सुकाळे , जिल्हा उपाध्यक्ष ऍड लक्ष्मण खुणे , रोहिदास फक्राबादकर , सचिन माने यांच्यासह एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी , वंचितचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.