Now Loading

फातिमानगर बस थांब्याची दुरावस्था

फातिमानगर सिग्नल चौकातून वानवडीला जाणाऱ्या शिवरकर रस्त्यावरील उजवीकडील पीएमपी बस थांब्यावरील बाकाच्या मागील जाळ्या तुटल्या असून त्या बाकड्यांवर पडल्यामुळे येथे थांबणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस थांब्यावरील पत्रे तुटल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ नागरिक आशा शिंदे केली होती. पण अद्याप बस थांब्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बस थांब्याच्या शेडमधील वरील बाजूचा अर्धवट तुटलेला पत्रा कधीही बाकावर बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर पडू शकतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर बस थांब्याची दुरुस्ती करावी. आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.