Now Loading

रेल्वे स्टेशन प्रवाशांची गैरसोय

पुणे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. गेल्या काही दिवसापासून बंद असलेली पुणे- हैद्राबाद रेल्वे येथून शुक्रवारी ९ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून हैदराबाद साठी विशेष गाडी रवाना झाली होती. ती आठवड्यातून रविवार, मंगळवार व शुक्रवार तीन दिवशी धावत आहे. सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान येणाऱ्या गाडीतून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची भरपूर गर्दी असते. परंतु हडपसर रेल्वे स्टेशनवर आल्यावर प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकाचे काम अपुर्ण आहे. प्लॅटफार्म २ व ३ वर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह व शौचालयाचे काम झालेले नाही. वेटिंग रूम नाही, कॅन्टीन ची सुविधा नाही. प्लॅटफार्म अपुर्ण अवस्थेत आहे. पार्कींगसाठी जागा नाही, रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अतिशय अरूंद आहे. जेष्ठ नागरिकांना सामानासहित जिना चढून येणे जिकीरीचे आहे. या असुविधांमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. हडपसर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाश्यांना निगडी भोसरी, पुणे स्टेशन, चांदणी चौक व मांजरी अशा विविध ठिकाणी अशा विविध ठिकाणी जायचे असते पण येथून बस किंवा रिक्षाची पुरेशी संख्या नसल्याने त्यांना तासन तास ताटकळत थांबावे लागते. कुठे जायचे ते कळत नाही. रेल्वे स्थानकावरून ताडीगुत्ता चौक, मुंढवा तुलसी हॉल चौक, महात्मा फुले चौक या ठिकाणी सामान घेवून सुमारे एक किलोमीटर चालत जावे लागते.