Now Loading

एस. टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सरकारने करू नये ; आमदार बबनराव लोणीकर जालन्यात आक्रमक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याना वारंवार पत्रव्यवहार तसेच वेगवेगळ्या माध्यमातून विनंती करून सुद्धा सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचा घणाघात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवारी जालन्यात केलाय. दीपावली व पाडवा सण उत्सवाच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस. टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून एस. टी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या असून ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ ‘बहुजन हिताय’ या भावनेने तुटपुंज्या पगारात जनतेची सेवा करताना कौटुंबिक समस्यांची पर्वा केली नाही अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे असे लोणीकर जालन्यात बोलत होते