Now Loading

शिक्षक दाम्पंत्य सुधीर बंडगर व सुनिता बंडगर यांनी घडवले माणुसकीचे दर्शन..

शिक्षक दाम्पंत्य सुधीर बंडगर व सुनिता बंडगर यांनी घडवले माणुसकीचे दर्शन...Teacher Damantya Sudhir Bandger and Sunita Bandigar appeared by the humanity S NEWS  शिक्षक सुधीर बंडगर डोंगरी , जंगल भागात शिक्षण  प्रसाराचे कार्यं करत   असतात. महात्मा फुले व सावित्रीबाई  फुले यांनी प्लेग संकटामध्ये कार्य केले.. त्याचप्रमाणे कोरोना संकटात डोंगरी भागात पोहचून बंडगर दाम्पंत्याने केलेले सामाजिक ,शैक्षणिक कार्यं कौतुकास्पद आहे... श्री. प्रदिपकुमार कुडाळकर        (गटशिक्षणाधिकारी, शिराळा पंचायत समिती     Teacher Sudhir Bandagar is working to spread education in hilly and forest areas.  Just as Mahatma Phule and Savitribai Phule worked in the plague crisis, the social and educational work done by the Bandagar couple in the mountainous areas in the Corona crisis is commendable.  Mr.  Pradip Kumar Kudalkar  Group Education Officer, Shirala Panchayat Samiti शिराळा हा सांगली जिल्ह्यातील डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. येथील डोंगरी वाड्यांवरचे विद्यार्थी मागास भाग व  आर्थिक अडचणीमुळे आधुनिक इंडिया पासून खुपच दुर आहेत. इस्लामपुर येथील समाजशील शिक्षक  सुधीर रामचंद्र बंडगर व शिक्षिका सुनिता सुधीर बंडगर या शिक्षक दाम्पंत्याने माणुसकीचे दर्शन घडवत डोंगरी , दुर्गम , जंगल भागातील ८०  चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच दीपावली फराळ वाटप करत चिमुकल्याची दिवाळी गोड केली. शिराळा तालुक्यात डोंगरी , दुर्गंम , जंगल  भागात अनेक वाड्या वस्त्या आहेत. शैक्षणिक ,आर्थिक दुष्ट्या मागास असणाऱ्या या वाड्यांच्या संकटात कोरोना काळाने आधिकच भर घातली आहे. तुटपुंजी शेती व स्थानिक रोजगार उपल्ध नसल्याने इथला तरुण वर्गं कामासाठी मुंबईला धाव घेतो. कोरोना लॉकडाऊन काळात मुंबईचे हातचे काम गेल्याने डोंगरी भागातील बांधव अडचणीत सापडले आहेत. अशा डोंगरी वांड्यावर पोहचून तेथील  उपेक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व मदत करण्याचे काम येथील समाजशील शिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर सातत्याने १२ वर्ष करत आहेत. डोंगरी भागात विवीध उपक्रम  राबवून क्रीडा व शिक्षण प्रसार करण्याचे काम ते करतात. कोरोना काळात अडीचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , मास्क , अरसेनिक अल्बम गोळ्याचेही त्यांनी वाटप केले आहे. दिपावली सण आपल्या सर्वांचा आनंदाचा व उत्साहाचा सण , मात्र डोंगरी भागात आर्थिक अडचणीत असणाऱ्या अनेक घरांमध्ये गोड धोड पदार्थ ना घराला रंगरगोटी , अशा जंगलातील दुर्गम भागात असणाऱ्या मणदूर धनगरवाडा ( ता. शिराळा ) व काळगाव  धनगरवाडा ( ता. पाटण) येथे इस्लामपुर येथील शिक्षक दाम्पंत्य सुधीर रामचंद्र बंडगर व सुनिता सुधीर बंडगर पोहचले. व त्यांनी वांड्यावरच्या ८० विद्यार्थ्यांना दीपावली फराळाचे वाटप केले. कोरोना मुळे कडू असणारी दिवाळी खऱ्या अर्थाने या माणुसकीच्या घासामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांसाठी गोड ठरली आहे. विक्रम  कोळेकर यांचेही या उपक्रमासाठी  सहकार्यं लाभले.या शिक्षक दाम्पंत्यामधील माणुसकीचे दर्शन व समाजशीलता निश्चितच कौतुकास्पद व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे...