Now Loading

बीआरटी मार्गात वाहनांची घुसखोरी

पुणे नगर महामार्गावरील बीआरटी मार्गावर इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी नेमलेले सुरक्षारक्षक लॉकडाऊन नंतर अजूनही नियुक्त करण्यात आलेले नाहीत. वाहनांच्या घुसखोरीमुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान त्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर आहे. नगर रस्त्यावर येरवडा ते खराडी पर्यंत बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आलेली आहे. मेट्रो कामामुळे येरवडा ते विमान नगर चौक पर्यंतचा बीआरटी मार्ग बंद आहे. तर सुरू असलेल्या विमाननगर चौक ते खराडी पर्यंतच्या बीआरटी मार्गातच इतर वाहनांची सर्वाधिक घुसखोरी होताना दिसून येते. अनेकदा खाजगी वाहनांमुळे बसलाच जायला जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे पीएमपीएल बस वाहतूक कोंडीत अडकल्याचे अनेकदा दिसून येते. ज्या ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू होतो तेथे सुरक्षा चिन्ह आणि सूचनाफलक योग्य प्रमाणात आणि दिसतील अशाप्रकारे लावलेले नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ उडतो. खराडी दर्गा परिसरात वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वाहनचालक बीआरटी मार्गात घुसखोरी करतात.