Now Loading

वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे आज बुधवार रोजी सुरू करण्यात आले मोफत कायदेविषयक सेवा केंद्र

भारतीय संविधानाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिकच आहे . या सर्वसामान्य नागरिकांसह वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोफत कायदेविषयक सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे . नागरिकांनीही आपापसातील वाद , तंटे सामोपचाराने मिटविण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा , असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस . व्ही . कोतवाल यांनी केले . जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , जिल्हाधिकारी कार्यालय , धुळे व जिल्हा वकील संघ यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मोफत कायदेविषयक सेवा केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम आज बुधवारी धुळे तालुक्यातील चुडामणनगर , पुरमेपाडा ,येथे आयोजित करण्यात आला होता . यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर . एच . मोहम्मद , जिल्हाधिकारी जलज शर्मा , पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील , विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव डॉ . डी . यू . डोंगरे , जिल्हा सरकारी वकील अॅड . देवेंद्र तवर , जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड . दिलीप पाटील , सरपंच सीमा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .