Now Loading

नाशिक - ओमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १५ हजारचा ऐवज चोरी

नाशिक - ओमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १५ हजारचा ऐवज चोरी झाली त्यात पैसे व चांदीचे दागिने याचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद मधुकर व्यास (रा.हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. व्यास यांच्या ओमनगर भागातील गजरा एनक्लेव्ह या सोसायटीतील घरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली सात हजाराची रोकड व चांदीचे दागिने असा १५ हजाराचा ऐवज चोरून नेला.अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत