Now Loading

शहादा रस्त्यावर वाघाडी टी पॉइटजवळ हॉटेल राजसगर जवळ खड्डे टाळण्याचा प्रयत्नात दुचाकी वरून महिलेचा तोल गेल्याने गंभीर जखमी

शिरपूर शहादा रस्त्यावर वाघाडी टी पॉईंटलगत हॉटेल राज सागर समोर खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात बुधवारी सकाळी तोल गेल्याने दुचाकीवरून खाली पडल्याने 45 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून सदर महिलेस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.देनाबाई नागजी भरवाड वय 45 रा दहिवद असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.सदर महिला बुधवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास दुचाकी वरून शिरपूर शहादा रस्त्याने वाघाडी कडे जात असतांना वाघाडी टी पॉईंट लगत हॉटेल राजसागर समोर खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने दुचाकी वरून खाली पडल्या.त्यात देना भरवाड ह्या गंभीर जखमी झाल्या सदर महिलेस लाला दुला भरवाड याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.याप्रकरणी डॉ.कदम यांच्या आदेशाने वार्डबॉय लखन भुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.