Now Loading

उद्या १२ नोव्हेबर ला होणार सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या प्रभागामधील जागेकरिता आरक्षणाची सोडत

सिंदेवाही- सिंदेवाही नगरपंचायतीचा ५ वर्षाचा कार्यकाल संपला असुन नव्याने निवडणुक होणार आहे त्यामुळे प्रभागामधील जागेकरिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या शुक्रवार दिनांक १२ नोव्हेबर रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समीती सभागृह सिंदेवाही येथे ठेवण्यात आला असुन यात प्रभागामधील जागेकरिता आरक्षणाची सोडत काढणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ई. आरक्षण सोडतचा कार्यक्रम असल्याबाताची माहिती मुख्याधिकारी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.