Now Loading

इस्लामपूर नगरसेविका कोमलताई बनसोडे यांचे "लाक्षणिक उपोषण.....Islampur corporator Komaltai Bansode's "symbolic fast

इस्लामपूर नगरसेविका कोमलताई बनसोडे यांचे "लाक्षणिक उपोषण.....Islampur corporator Komaltai Bansode's "symbolic fast S NEWS  इस्लामपूर: नगरसेविका कोमलताई बनसोडे यांचे "लाक्षणिक उपोषण" .... Islampur corporator Komaltai Bansode's "symbolic fast "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना" नामफलक प्रभाग क्रमांक ३,५ आणि १४ मध्ये लावण्यात यावेत यासाठी छ. शिवाजी महाराज, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात नगरसेविका मा. कोमलताई बनसोडे यांचे  "लाक्षणिक उपोषण"    उरुण- इस्लामपूर नगरपरिषदेच्या नगरसेविका मा. कोमलताई बनसोडे यांनी सकाळी १० वाजता  नगरपरिषदेच्या विरोधात आपले लाक्षणिक उपोषण सुरू केले.   प्रारंभी नगरसेविका कोमलताई बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.   उपोषणस्थळी मंडपामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन कोमलताई बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   उपोषण स्थळी नगरसेविका मा. प्रतिभाताई शिंदे, माजी नगरसेवक सुभाष शिंगण, लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी  भेट देऊन जाहीर पाठींबा दिला...