Now Loading

निराधारांचे भाऊ अशोक पोकळे कडून लाडक्या कांतीला संपूर्ण पोशाख देऊन दिवाळी भाऊबीज भेट आष्टी प्रतिनिधी " तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी " या म्हणीप्रमाणे आपण आनंद घेण्यापासून वंचित राहू नये या उद्देशाने नेहमीच कोणत्या ना कोणत्या सुखदुःखाच्या गोष्टी तून कोणाचे अश्रू पुसण्याचे काम असेल कुणाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी होण्याचं काम असेल वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम असेल किंवा कोणाचा भाऊ म्हणून भाऊबीज करण्याचं काम असेल हे प्रत्येक क्षणाचा आनंद आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उपसरपंच अशोक अण्णा पोकळे हे अनेक वर्षांपासून करत आहेत त्याची प्रचिती आष्टी येथे लाडक्या कांती या निराधार महिलेला त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काल पूर्ण उभा पोशाख भेट देऊन भाऊबीज दिली आहे त्याची या कार्याबद्दल संपूर्ण तालुका भरा मध्ये चर्चा आहे.