Now Loading

अस्थिव्यंग व नेत्रव्यंग तपासणी दर बुधवारी तर नाक,कान व घसा दिव्यांग तपासणी दर शुक्रवारी

चिखली : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे अस्थिव्यंग, नेत्र, कान, नाक व घसा, मतिमंद / मनोरूग्ण संबंधित दिव्यांग बोर्ड महिन्यातील प्रत्येक बुधवारी सुरू आहे. या बोर्डामध्ये बरेच प्रमाणात दिव्यांग व्यक्तींची एकाचवेळी गर्दी होत असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होत आहे. तरी दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होवू नये म्हणून यापुढे अस्थिव्यंग व नेत्र प्रवर्गातील दिव्यांग तपासणी शिबिर नियमितपणे महिन्यातील दर बुधवारी व मतिमंद / मनोरूग्ण व कान नाक घसा संबंधित दिव्यांग तपासणी महिन्यातील दर बुधवार ऐवजी दर शुक्रवारी करण्यात येत आहे. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकिस्तक यांनी केले आहे.