Now Loading

शासकीय अध्यापक महाविद्यालयात तासिका तत्वावरील पदांसाठी मुलाखतीचे आयोजन · परफॉर्मींग आर्ट्स शिक्षक, फाईन आर्ट्स शिक्षक, ग्रंथपाल व शारिरीक शिक्षण निर्देशक पद · 17, 18 व 22नोव्हेंबर रोजी मुलाखती

चिखली : येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर पदे नियुक्त करावयाची आहेत. त्यामध्ये सहायक प्राध्यापक अध्यापन 2 पदे, परीपेक्ष 2 पदे, परफॉर्मींग आर्ट्स शिक्षक 1 पद, फाईन आर्ट्स शिक्षक 1 पद, ग्रंथपाल 1 पद, आरोग्य आणि शारिरीक शिक्षण निर्देशक 1 पदाचा समावेश आहे. या पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन 17, 18 व 22नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले आहे. सहायक प्राध्यापक अध्यापन शास्त्र पदासाठी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2,परीपेक्ष पदांसाठी 17 नोव्हेंबर रोजी दु. 2 ते 5, परफॉर्मींग आर्ट्स शिक्षक पदासाठी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5, फाईन आर्ट्स शिक्षक पदासाठी 22नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2, तर ग्रंथपालसाठी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2,  आरोग्य व शारिरीक शिक्षण निर्देशक पदासाठी 18नोव्हेंबर रोजी दु 2 ते सायं 5 वाजे दरम्यान मुलाखती होणार आहे. परफॉर्मिंग आर्ट्स शिक्षक पदाकरीता संगीत, नृत्य अथवा थिएटर विषय आहे. या पदाकरीता एम.ए (संगीत/नृत्य/थिएटर) 55 टक्के उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. तसेच फाईन आर्ट्स शिक्षकाकरीता चित्रकला, हस्तकला अथवा छायाचित्रण विषय आहेत. सदर पदाची शैक्षणिक अर्हता एम.एफ.ए (हस्तकला/ चित्रकला/ छायाचित्रण) पदवी 55 टक्के उतीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रंथपाल पदाकरीता बी.लिब  55 टक्के एम.लीब 55 टक्के असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदाचा विषय ग्रंथालयशास्त्र आहे. आरोग्य व शारिरीक शिक्षण निर्देशक पदाचा विषय आरोग्य व शारिरीक शिक्षण आहे. यासाठी एम.पी.एड (योग विषयासह) 55 टक्के गुण व योग शिक्षण पदविका असल्यास प्राधान्य राहणार आहे.तसेच सहायक प्राध्यापक अध्यापनशास्त्र पदासाठी गणित व विज्ञान विषय आहे. यासाठी एमएससी 55 टक्के व एमएड 55 टक्के गुणंसह उत्तीर्ण असावे. परीपेक्ष पदासाठी इंग्रजी परीपेक्ष शिक्षण विषय आहे. यासाठी एमए 55 टक्के, एम एड 55 टक्के गुण असावे. या विषयांकरीता घड्याळी तासिकेवर नियुक्ती करण्याकरीता इच्छूक पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहितीसह अर्ज व कागदपत्रांच्या मुळ आणि छायाप्रतींसह स्वखर्चाने शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथे उपस्थित रहावे. घड्याळी तासिकेचे मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहणार आहे. ही नियुक्ती शैक्षणिक वर्ष 2021-22 सत्रासाठी मर्यादीत असेल. अर्जाचा नमुना www.gcebedbuldan.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एस.एस. लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.