Now Loading

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती ·        12 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी

चिखली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 335 सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर 12 नोव्हेंबर पर्यंत आपल्या डिस्जार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदवावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे. या पदाकरीता माजी सैनिक 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा जन्म झालेला नसावा. शिक्षण कमीत कमी 8 वा वर्ग पास किंवा 12 वी उत्तीर्ण असावा, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्यदलातील हुद्दा जास्तीत जास्त हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड असावे, तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार, अपंगत्व नसावे. तो शारिरीकदृष्ट्या सक्षम असावा, तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.