Now Loading

कोरोना अलर्ट : प्राप्त 504 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

चिखली : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 127 तर रॅपिड टेस्टमधील 377 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 504 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                           पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.      त्याचप्रमाणे आजपर्यंत 733273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86941 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86941 आहे.  आज रोजी 126 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 733273 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87622 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86941 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 07 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.