Now Loading

रेल्वेच्या धडकेने ४९ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू

चिखली : नांदुरा तालुक्यातील खुमगावजवळ लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत ४९ वर्षीय व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. ही घटना आज, ११ नोव्हेंबर पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) घडली. नंदकिशोर महादेव महाले (४९, रा. अमलपूर, ता. नांदुरा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस सुनील कवडकार, माजिद खान, ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार यांनी मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नांदुरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात हलविण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.