Now Loading

टाटा मॅजिक-ट्रॅक्‍टरची धडक; ७ प्रवासी जखमी

चिखली : टाटा मॅजिकची ट्रॅक्टरशी धडक झाली. यात टाटा मॅजिकमधील ७ प्रवासी जखमी झाले. ही घटना १० नोव्हेंबरला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. ही घटना सोनज-नांदुरा रोडवर घडली. टाटा मॅजिक वाहन (क्र. एमएच २८ एझेड ७५९७) सोनजकडून नांदुऱ्याकडे प्रवाशी घेऊन येत होते. अचानक शेतातून रोडवर येणाऱ्या ट्रॅक्टरशी (क्र. एमएच २८ डी २४५५) या वाहनाची धडक झाली. टाटा मॅजिक रोडवरच उलटले. यात वाहनातील प्रवासी चेतन दिलीपराव देशमुख (२६), मंदा पुरुषोत्तम बोके (५०), छाया मोहन देशमुख (३५), रत्नकला अनंत बाठे (३६), सृष्टी अनंता बाठे (१८), रेखा संजय खंडागळे (४०), तुकाराम रुपाजी वाकोडे (९३, सर्व रा. सोनज) जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार, कृष्णा नालट यांनी दोन रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमींना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. जयस्वाल व कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. तीन जखमींना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे.