Now Loading

दुर्मीळ काळ्या बिबट्याचा (ब्लॅक पॅंथर) वन विभागाने बचाव केला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याचा (ब्लॅक पॅंथर) वन विभागाने बचाव केला. कुडाळमधील गोवेरी गावातील एका बागेमधील पाणाच्या टाकीत दोन दिवसांपासून काळ्या बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला टाकीबाहेर काढले. दुर्मीळ काळ्या बिबट्याचे हे पिल्लू नर असून ते साधारण एक ते सव्वा वर्षाचे आहे. सिंधुदुर्गातून प्रथमच काळ्या बिबट्याचा बचाव करण्यात आला आहे.