Now Loading

१४ बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याकडून जाहीर

नाशिक जिल्ह्यातील २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या १४ बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातले राजकीय वातावरण तापले आहे. नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती  सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून ज्या कृषी उत्पन्न बाजार समितींची मुदत संपली होती, त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे कळवले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट काहीशी कमी झाली आहे.तर तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर करण्यात आल्यात. त्यात नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव, सुरगाणा या बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. त्यासाठी १० नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.