Now Loading

एस टी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपला ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात आला गुरुवार रोजी बस स्थानक परिसरात जाहीर पाठिंबा

एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक भाई केदार यांच्या आदेशान्वये ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा यांचा वतीने पाठिंबा देण्यात आला. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे तसेच प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्या. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील यावेळी सागर भाऊ मोहिते, विकास अमृत सागर, गोकुळ जाधव , मायाताई पानपाटील, निखिल सराफ, समाधान मंगळे, राकेश महाले, समाधान सोनावणे, जगदीश पवार, हर्षद जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.