Now Loading

चक्करबर्डी परिसरात तरुणास बेदम मारहाण चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल

ॲडव्हान्स दिलेली किराणा मालाची रक्कम परत मागितली याकारणावरून किरकोळ किराणा माल विक्रेता शाहरूख अयुब शेख वय २७ रा . चित्तोड रोड , धुळे यास चौघांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात तो जखमी झाला . तर त्याचा मित्र शुभम यास धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. या भांडणात शाहरूख याच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोनसाखळी कोठेतरी पडून गहाळ झाली . ही घटना बुधवारी रोजी चक्करबर्डी परिसरात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळील हॉटेल भंडारानजीक घडली आहे . याप्रकरणी संतोष सुंदरदास भटेजा , सुनिल सुगनामल भटेजा , सुनिलचे वडील सुगनामल भटेजा व एक अनोळखी इसम सर्व रा . अमळनेर या चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहे.