Now Loading

सुरत नागपूर महामार्गावर नेल गावाजवळ ट्रक व आर्टिका कारचा अपघात

आर्टिका कारचा अचानक टायर फुटल्याने कार थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली या अपघटता कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आर्टिका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हा अपघात सुरत नागपूर महामार्गावरील नेल गावाजवळ हॉटेल आनंद येथे झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरत होऊन अकोल्याकडे जाणाऱ्या आर्टिका कारचा सुरत नागपूर महामार्गावरील नेर गावाशेजारी हॉटेल आनंद जवळ अचानक टायर फुटला त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली ट्रकही हैदराबाद हुन सुरत येथील एका मार्केट ला जात होती . अपघातात कुठलीही प्रकाराची जीवित हानी झाली नाही यात कार चालकास किरकोळ दुखापती सह कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले