Now Loading

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आज गुरुवार रोजी निवेदन

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने धुळे महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त देविदास टेकाळे यांना कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले तसेच चर्चा देखील करण्यात आली आहे. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी माध्यमांशी बोलताना सांगितले की कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठकीसाठी वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेच्या आयुक्त तसेच महानगरपालिकेचे संबंधित पदाधिकारी हे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना दुर्लक्ष करत असल्यामुळे आयुक्तांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे आयुक्तांनी सकारात्मकतेने न घेतल्यास व मागण्यांसंदर्भात भूमिका न घेतल्यास कास्ट्राईब संघटना जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील यावेळी संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.