Now Loading

मालमत्ता कर विभागाचे विशेष लेखापरीक्षण करा, स्थायी समिती सभापती संजय जाधव यांची आयुक्तांकडे मागणी

महापालिकेतील मालमत्ता कर विभागाचे सुरुवातीपासून लेखा परिक्षण झालेले नाही . या विभागाबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आहेत . त्यामुळे मालमत्ता कर विभागाचे विशेष लेखा परिक्षण करण्यात यावे , असे पत्र स्थायी समितीचे सभापती संजय जाधव यांनी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांना दिले आहे . महापालिकेतील मालमत्त कर विभागामार्फत शहरातील नागरीकांकडुन कर वसुली करण्यात येते . परंतु या विभागाचे सुरुवातीपासुन लेखा परिक्षण झालेले नाही . महापालिकेच्या स्थायी समिती सभा , महासभा तसेच विविध बैठकांमध्ये मालमत्ता कर विभागातील कामांबाबत चर्चा होवुन सदस्य कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करीत असतात . तसेच यापुर्वीदेखील मालमत्ता कर विभागातील भ्रष्टाचार तसेच गैरकारभारामुळे जळीत कांडदेखील झालेले आहे . त्यावेळच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट पुस्तके तयार करून बोगस वसुली करणे , वसुलीचा पैसा मनपात भरणा न करता स्वतः वापरुन घेणे , मुळ रजिष्टर्स गहाळ करणे यासह अनेक गैरप्रकार केलेले आहेत . त्यावेळी लेखा परिक्षण केले जाणार होते. त्यातुन सर्व भ्रष्टाचार उघड होणार होता . म्हणुन पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेरील गुंडांना सुपारी देवुन वसुली विभागच जाळुन टाकला . आजपर्यंत या विभागातील दोषींवर न्यायालयात दोषारोप दाखल होवुन प्रकरण प्रलंबीत आहे . परंतु महत्वाचे पुरावेच नष्ट झालेत , यानंतर सुध्दा असले प्रकार सर्रासपणे सुरु असण्याची शक्यताच नाही तर खात्रीच आहे . पुन्हा कधी या विभागावर बालंट येण्याची शक्यता वाढल्यास पुन्हा जळीत कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही .