Now Loading

राज्य शासनातर्फे आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई धुळे जिल्ह्यात जवळपास 56 कर्मचाऱ्यांचे करण्यात आले निलंबन

विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी आज गुरुवार रोजी माध्यमांना दिली माहिती विलनीकरणासह थकित पगारासाठी संपावर उतरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या कर्मचा - यांनी केला आहे . निलंबनाचा घाव घालुन धुळ्यातील पाच कर्मचाऱ्यांसह सुमारे 30 हुन अधिक कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार निलंबीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . तसेच जिल्ह्यात जवळपास 56 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे धुळ्यातून निलंबीत झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी दोन जण सत्ताधारी शिवसेनेशी संबंधीत कामगार संघटनेचे प्रतिनिधी आहेत . निलंबनाच्या नोटीसीची खबर मिळताच आंदोलन स्थळी एका कर्मचा - याची तब्येत बिघडली . त्याला ताबडतोब रुग्णालयात भरती करण्यात आले आहे . निलंबनाच्या कारवाईबाबत धुळे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्याशी प्रसमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकारी सपकाळ यांनी सांगितले आहे.