Now Loading

त्रासलेल्या प्रवाशाने धुळे आगारात आंदोलकांची भेट घेत राज्य सरकारला संतप्त प्रश्न विचारत संपाला दिला पाठिंबा

राज्य शासनाने खाजगी प्रवासी धारकांना प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी दिली परंतु भाडे आकारणी संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती त्यांना का घातल्या नाहीत असा संतप्त प्रश्न प्रवाशाने व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे. या सर्वसामान्य प्रवाशाला खाजगी वाहनधारकांकडून झालेल्या त्रासा बद्दलचा व्यक्त केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे यासाठी संप पुकारला आहे. अशा परिस्थितीमध्ये नेहमी एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने एसटीचा संप सुरू आहे, त्यावेळी खाजगी वाहनातून प्रवास केल्यानंतरचा आपला अनुभव धुळे आगारामध्ये संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यां समोर व्यक्त केला आहे. एसटीचा संप सुरू झाल्यापासून खासगी वाहन धारकांकडून कशा पद्धतीने प्रवाशांची लूट केली जात आहे याची व्यथा या प्रवाशाने संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यां समोर मांडली. या प्रवाशाने मालेगाव पासून धुळे पर्यंत खाजगी वाहनातून प्रवास करताना या खाजगी वाहन मालकांनी अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी केली व याबाबद या प्रवाशाने इतके भाडे का अशी विचारणा केली असता खाजगी वाहनधारकांनी अक्षरशा या प्रवाशास गाडीमध्ये बसण्यास मज्जाव केला व गाडी फुल झाली आहे असे कारण दिले. त्यानंतर या प्रवाशाने आपली व्यथा या एसटी कर्मचाऱ्यांना समोर व्यक्त करताना सर्वसामान्य नागरिकांना देखील या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.