Now Loading

कर बुडणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांवर कारवाई करण्यासंदर्भात समाजवादी पार्टीतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

केंद्र सरकारतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी आपल्या एका पेक्षा जास्त वाहनांवर एक सारखाच क्रमांक वापरून शासनाचा कर बुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या वाहनांना ब्लॅक लिस्ट करून ट्रान्सपोर्ट कंपनी देखील बंद करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या संदर्भातील निवेदन संबंधित प्रादेशिक परिवहन विभागाच्या धुळे येथील अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याचबरोबर रिक्षा मालकांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वेठीस धरण्याच सध्या काम सुरू असल्याचा आरोप देखील या निवेदन कर्त्यांनी केला आहे. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रिक्षा मालकांना वेठीस धरणे बंद करावं असा देखील उल्लेख या निवेदनामध्ये करण्यात आला असून, पुढील काळात रिक्षा मालकांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वेठीस धरण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.