Now Loading

सातगाव (डोंगरी) येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन...

सन - २००३ मध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे झाला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. धकाधकीच्या जीवनात मोबाईल द्वारे फक्त बोलणे होते. एकमेकांना भेटणे दुर्मिळ झालेले असतांना दुर झालेले मित्र उशिरा का होईना एकमेकांना भेटावे अशी त्यांची इच्छा असल्याने स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी औरंगाबाद, जळगाव, जामनेर या ठिकाणी असलेले मित्रमंडळी या निमित्ताने एकत्र आले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यामध्ये शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे, डी. आर. वाघ सह शिक्षक वर्ग उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी गजानन लाधे, सतिश लोहार, मुस्‍तकीम मन्यार, गोकुळ वाघ, भागवत माळी, संदीप पवार, सतीश पाटील, जाकीर तडवी, परमेश्वर कोळी, परसराम लाधे, तानाजी पाटील, अकबर तडवी, शेख शब्बीर, मुस्ताक शहा मस्ता शहा, रशिद तडवी (जालना), रमेश तडवी (पिंपळगाव हरे), सिकंदर तडवी (सावखेडे खु"), शरीफ तडवी (कडे वडगाव), गुलाब तडवी (पिंपरी बु"), जुम्मा शा नजीर शहा (भडगाव), गजानन बडगुजर (पिंपळगाव हरेश्वर), इंदरचंद राठोड (नांदगाव तांडा), ज्ञानेश्वर राठोड (नांदगाव तांडा), ईसा तडवी सह मित्र परिवार उपस्थित होता.