Now Loading

रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी रहीम शेख यांचे हृदयविकाराने निधन

रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी रहीम इब्राहिम शेख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी, ११ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांनी रेल्वेमध्ये अकाउंटंट म्हणून सेवा बजावली होती, ते मृत्यूसमयी ६५ वर्षांचे होते. हैदराबाद रस्त्यावरील दीपक ट्रान्सपोर्ट शेजारील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा शुक्रवारी, दुपारी ११ : ३० वाजता निघणार आहे. त्यांचा सुपूर्द-ए-खाक (दफनविधी) चिराग अली तकिया कब्रस्तानात होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, चार मुली, सून-नातवंडे असा परिवार आहे.