Now Loading

भरदिवसा उघड्या घरात चोरी

होटगी रोड, ब्रह्मदेवनगर मजरेवाडी परिसरात उघड्या घरात चोरट्याने घुसून घरातील १७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवार दि. ९ नोव्हेंबर रोजी घडली. सुलभा राजकुमार निकंचे (वय ४८) ही महिला तिच्या घरी होती. तिची मुले दरवाजा पुढे करून कापड़ी पडदा लावून कामाला गेले असताना भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील रोख १० हजार रूपये, चांदीचे पैंजण, सोन्याचे कानातील नथ आणि बाली आणि बँक ऑफ इंडियाचे पासबूक आधार कार्ड, शाळेचा दाखला असा एकूण १७ हजार ८०० रुपयाचा ऐवज चोरून नेला. अशी फिर्याद सुलभा निकंबे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली. तपास पोलीस नाईक सणुरे करीत आहेत.