Now Loading

टॉवेल कारखान्यास आग ; १५ लाखांचे नुकसान

सोलापूर अक्कलकोट रोड, एमआयडीसीयेथील दासरी टॉवेल कारखान्याला गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या •●सुमारास आग लागून १५ लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटम ळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनेनंतर अग्निशामक दल अधिकारी हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. टॉवेल कारखान्यामुळे सूत आणि पाण्याचे बडल होते. त्यामुळे आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते. अग्निशामक दल अधिकारी केदार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १० ते १२ गाड्यांनी पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणण्यात आले.