Now Loading

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मालवणात ६ विधवा, निराधार महिलांना प्रत्येकी २० हजारांची मदत

मालवण : संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मालवणात ६ निराधार, विधवा महिलांना प्रत्येकी २० हजारांची मदत देण्यात आली. समितीचे अध्यक्ष तथा मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या हस्ते मालवण तहसील कार्यालयात हे धनादेश संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. यामध्ये वृषाली सूर्यकांत कुमठेकर (देवबाग), श्रुतिका दत्ताराम केळुसकर (दांडी), रंजना रमेश जुवेकर (वराड), अस्मिता सुहास तळगावकर (तळगाव), नेहा चंद्रकांत केळुसकर (तारकर्ली) व नतालिन इशेद मेंडीस (रेवतळे) या महिलांचा समावेश आहे. यावेळी नायब तहसीलदार कोकरे, उदय मोंडकर, दिनेश सावंत, प्रसाद आडवणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.