Now Loading

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' चे शूटिंग पूर्ण

'आदिपुरुष'चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. 'रामायण' या महाकाव्यावर बनत असलेल्या या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान, क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या बहुभाषिक चित्रपटात प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत तर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन माता जानकीची भूमिका साकारत आहे.
 

अधिक माहितीसाठी: India TV | Bollywood Hungama | Hindustan Times