Now Loading

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला लाभल मोठे यश, हिजबुलचे २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चवलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दलांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. परिसर रिकामा करून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. मात्र त्याने गोळीबार सुरूच ठेवला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.