Now Loading

30 नोव्हेंबर पर्यंत घरोघरी लसीकरणाचे नियोजन.

कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने लसीकरणाचा वेगही मंदावला आहे तो वेग वाढविण्याकरिता हर घर दस्तक या योजनेअंतर्गत 30 नोव्हेंबर पर्यंत घरोघरी वार्डानिहाय व मोहल्लानिहाय लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक नागरिकांना किमान पहिला डोस तरी मिळाला पाहिजे यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्यात येणार आहे चोपडा तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस 1 लाख 48 नागरिकांनी घेतलेला आहे तर दुसरा डोस 48 हजार नागरिकांनी घेतलेला आहे उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी झाल्याने घरोघरी जाऊन लसीकरण करणे किंवा लोकांच्या सोयीनुसार त्या वेळेवर लसीकरण करण्याचा नियोजन करण्यात आलेले आहे त्यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी सांगितले.