Now Loading

केशवनगरमध्ये सॅनिटरी पॅडचे वाटप

लायन्स क्लब पुणे ऑफ अग्रेसन व लायन्स क्लब पुणे कल्चर आणि शिवसेना मुंढवा-केशवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गायरान व भोई वस्तीतील साडेचारशे गरजू महिला-मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे कँटोन्मेंट बँकेचे संचालक देवेंद्र भाट यांनी केले होते. करूणा भाट यांनी मार्गदर्शन केले. लायन्स क्लबचे रवी अग्रवाल व शेखर पेटकर यांनी विशेष सहकार्य केले. लता पवार, अरुणा गागडे, रिता गुमाने, संगीता पवार या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.