Now Loading

गॅस सिलिंडर च्या भाववाढीमुळे चुलीवर स्वयंपाक

दररोज पेट्रोल - डिझेल च्या किमती वाढत असतानाच घरगुती गॅसचा दरही वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या संसारातील गणित कोलमडले आहे, कोरोना च्या काळात मे 2020 पासून ग्राहकांना सरकारने सबसिडी वर्ग केलेली नाही, गॅसच्या दरात फारसा फरक नसल्याने सबसिडी मिळत नाही, त्यातच उज्वला योजनेतून सरकारने गॅस दिला, त्याची सवय लावली त्यामुळे घरातील चुली देखील बंद झाल्या आहेत, त्यातच सरकारने गॅसचे भाव वाढवत सबसिडी बंद केली, त्यामुळे गरीब ग्रामीण लाभार्थ्यांना गॅस घेणे परवडत नाही, उज्वला योजनेतील अनेक ग्राहकांना सबसिडी मिळत नसल्यामुळे त्यांना पुन्हा चूल पेटवावी लागत आहे, त्यामुळे घरात होणारा धूर, डोळ्यांना होणारा विकार पाहून हेच का अच्छे दिन? हाच का विकास? असे शब्द ग्रामीण भागातून सुद्धा ऐकावयास मिळत आहे, अनेक खेड्यापाड्यात हे दृश्य दिसत असून मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर सुरू होऊन व रॉकेलचे पुन्हा वाटप व्हावे अशी मागणी होत आहे, भाव वाढ ने लाकडांचा वापर जास्तीत जास्त सुरू होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे, याची सर्वस्वी जबाबदारी कोण स्वीकारेल? या ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी कोण धजावेल? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एकत्रित रित्या योग्य तो निर्णय घेणे अपेक्षीत असल्याचे बोलले जात आहे,