Now Loading

अजिंठा लेणीत बैलगाडीचा प्रवास

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे वेतन वाढीसह इतर विविध मागण्यासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरु आहे. यामुळे सर्वच ठिकाणची बससेवा ठप्प झाली आहे. अजिंठा लेणीत असलेल्या पर्यावरणपूरक बससेवा ही या आंदोलनामुळे बंद असल्यामुळे पर्यटकांना बैलगाडीने प्रवास करावा लागला. दरम्यान, ११ रोजी प्रशासनाने खाजगी वाहनांना अजिंठा लेणी मध्ये प्रवेश देण्यात आला आहे यामुळे तब्बल अठरा वर्षांपासून बंद असलेली लेणीतील खाजगी प्रवासी वाहतूक यानिमित्ताने सुरू झाली आहे. बैलगाड्यांवर चा प्रवास अनेक वर्षांपासून अनेक आणि अनुभवलेला नसेल मात्र हा प्रवास एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील देशी-विदेशी पर्यटकांना अनुभवायला मिळाला आहे. अनेक पर्यटन स्थळांवर वाफेचे रेल्वे इंजिन, घोडा गाडी, याच्यावरून प्रवास अनुभवता येत होता मात्र बैलगाड्या वरील प्रवासाचा अनुभव अनेकांना नसला तरी सध्याच्या हायटेक जमान्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे पर्यटकांना बैलगाडी घेऊन अजिंठा लेणी चे पर्यटन करण्याचा अनुभव मागील तीन दिवसात मिळाला आहे. संपामुळे बंद असलेले एसटी सेवेमुळे सेंटर पर्यंतच्या चार किलोमीटर प्रवासासाठी बैलगाडी चालकांकडून प्रति प्रवासी शंभर रुपये दर आकारला जात होता त्यामुळे पर्यटकांची आर्थिक होती. मात्र या प्रवासाचा अनुभव काहींना नवीनच मिळत होता. खासगी वाहनांना परवानगी- एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू असताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे जाण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपला बैलगाडीतून पर्यटकांना अजिंठा लेणी ची सफर घडवली होती का गेल्या तीन दिवसापासून या बैलगाड्या मधून पर्यटकांची सफर सुरू होती. रा बैलगाडीतून पाच ते आठ प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती त्यामुळे बैलांची होणारी हेळसांड व घटकांना पर्यटनासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ११ रोजी दुपारी तीन वाजता अजिंठा टुरिझम सेंटर पासून अजिंठा लेण्यापर्यंत खाजगी दहा वाहनांना परवानगी दिली आहे या वाहनांमधून प्रवासाच्या काळानुसार आकारले जात आहे.ही परवानगी केवळ अकरा तारखे भरती असल्याचे सांगण्यात आले आहे. संप कायम सुरू राहिल्यास यापुढे अशा प्रकारची परवानगी देण्यात येणार असल्याचे येथील येथील खासगी वाहतूकदारांकडून सांगण्यात आले. पर्यटकांची वाढती गर्दी- प्रत्येक दीपावली पर्व संपले आहे विद्यार्थी अनेक संस्थांना सुट्टी असल्यामुळे पर्यटक अजिंठा येथे पर्यटनासाठी येत आहे याच काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांची पर्यटनाचा मूड ऑफ झाला होता मात्र बैलगाडी नंतर खासगी वाहनांना परवानगी दिली आहे काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र बस सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे 18 वर्षानंतर लेणीत धावली खाजगी वाहतूक - अजिंठा पर्यटन स्थळावर पर्यावरणाचा होत असलेला परिणाम लक्षात घेता सन २००३ पासून थेट अजिंठा लेणी पर्यंत खाजगी वाहनांना परवानगी नाकारण्यात आली होती या ठिकाणी परिवहन विभागाच्या सीएनजी बस गाड्यांनाच प्रवास देण्यात आला होता या गाड्यांमधून प्रवाशांना तीस रुपये भाडे आकारण्यात येते. मागील 18 वर्षांपासून पासून ते अजिंठा लेण्या पर्यंत खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे मात्र 11 रोजी अठरा वर्षात पहिल्यांदाच अजिंठा लेणी या दहा गड्यांना अजिंठा लेण्यांमध्ये जाण्यासाठी खासगी वाहनांचा प्रवास आपत्कालीन परिस्थितीत सुरू झाला आहे.