Now Loading

कोरोना लसीकरणाचे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठ प्रशासन सज्ज 

चिखली : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सध्या नियंत्रणात असले असून कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हा आजतरी एकमेव पर्याय आहे. नागरीकांनी लसीकरण करीता स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे लसीकरण 100 टक्के 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या गावातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच जनजागृतीसाठी दवंडीद्वारे माहिती, हस्तपत्रकेद्वारे माहिती, सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या गावांच्या नागरिकांचे 10 टक्के लसीकरण झाले आहे. त्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर गावांनी अनुकरण करून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य होईल, याकरीता प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.