Now Loading

सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज वाटप सुरू • 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे 

चिखली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिनस्त कार्यरत जिल्ह्यातील एकूण 17 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अर्ज वाटप संबंधित वसतीगृहांवर सुरू झालेले आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेशासाठी संबंधित वसतीगृहांवर अर्ज भरून सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे.