Now Loading

भाजपला मी भीत-बित नाही

पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. नियोजन भवनात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर पत्रकार परिषदेदरम्यान एसटी कर्मचारी आंदोलनाचा विषय निघाला. त्यावेळी पत्रकारांनी या आंदोलनात आता भारतीय जनता पार्टीने उडी घेतल्याने सरकार तोडगा का काढत नाही, गप्प का? असा प्रश्न केला.  त्याच वेळी काही पत्रकारांनी पालकमंत्र्यांना तुम्ही भाजप विरोधात बोलायला घाबरता का असेही विचारले. याच दरम्यान सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित दुसऱ्या समांतर जलवाहिनीचा मक्ता रद्द करण्यात आल्याचे समोर आले. याच वेळी पालकमंत्री म्हणून आपली भूमिका काय असाही प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.  त्यावेळी पालकमंत्री भरणे मामा यांनी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी एकदा तरी पालकमंत्री म्हणून मला बैठकीला बोलावले आहे का असे म्हणून थेट नाराजी व्यक्त केली.  मी भाजपला घाबरत बिबरत नाही आता येणाऱ्या आठ दिवसात महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीची बैठक घेणार असल्याचे सांगितले